विद्यार्थी विभाग

नियमावली

    उपरोक्त विषय संदर्भानुसार महाराष्ट्र राज्यातील शासकीय व शासनमान्य अशासकीय अनुदानित व विनाअनुदानित कला संस्थामध्ये अध्ययन करणाऱया विद्यार्थ्यांच्या कलाकृती विद्यार्थी विभागाच्या प्रदर्शनाच्या प्रवेशिका दि.२०/११/२०२३ ते दि.३/१२/२०२३ या कालावधीत https://doa.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर ऑनलाईन स्वरुपात स्विकारल्या जातील. तरी आपल्या संस्थेतील विद्यार्थ्याच्या कलाकृती निर्देशित तारखांना सादर करण्याची व्यवस्था संबंधित संस्थेच्या अधिष्ठाता / प्राचार्य यांनी करावी.

  • 2. ऑनलाईन पध्दतीने विद्यार्थ्यांच्या कलाकृती सादर करतांना प्रथम संबंधित संस्थेचे अधिष्ठाता / प्राचार्य यांनी त्यांच्या संस्थेचा रजिस्टर आयडी व पासवर्ड https://doa.maharashtra. gov.in/ या संकेतस्थळावर तयार करण्यात यावे व सदर रजिस्टर आयडीवरुनच आपल्या संस्थेतील विद्यार्थ्याच्या कलाकृतीविषयक माहिती भरावी.
  • 3. ऑनलाईन इमेज साईज संदर्भात:- डिजीटल इमेज ही जेपीईजी (JPEG) मध्ये असावी. त्याची साईज किमान 2100 पीक्सेल लांबी / रुंदी (आडवी बाजू किंवा उभी बाजू). 2500 पिक्सेलच्या वर साईज नसावी. उदा. ऑनलाईन इमेज 5 X 7 इंच व 300 डीपीआय (DPI) असेल तर ती 1500 पीक्सेल X 2100 पिक्सेल होईल.
  • 4. फाईल फॉरमॅट :- ईमेज ही जेपीईजी (JPEG) मध्येच असावी. ईमेज फाईलचे नाव पुढील प्रमाणे असावे, विद्यार्थ्याचे नाव_ विभाग_ कलाकृतीचे शिर्षक_कलाकृतीचे माध्यम_कलाकृतीची किंमत उदा: Ashok-Raut_Painting_Landscape_Water Colour_20000.jpg
  • 5. ऑनलाईन डिजीटल इमेजेस वरुन प्रदर्शनाकरिता कलाकृतींची निवड केली जाईल. प्रदर्हनाकरिता निवडण्यात आलेल्या कलाकृतीची यादी उक्त संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.
  • 6. प्रदर्शनाकरिता निवड झालेल्या कलाकृती दि.१८ ते १९ डिसेंबर, २०२३ या कालावधीत सकाळी ११.०० ते दु.४.०० या वेळेत कला संचालनालय, सर ज.जी.कला दालन, कलाशाळा आवार, डॉ. दा.नौ.मार्ग, मुंबई-४०० ००१ येथे पोहचवण्याची व्यवस्था संबंधित संस्थेने करावी. उशिरा येणाऱ्या कलाकृतींचा विचार करण्यात येणार नाही. अशा निवड झालेल्या कलाकृती या संचालनालयास प्राप्त झाल्यानंतर त्यातून पारितोषिकाकरीता निवड करण्यात येईल. पारितोषिक प्राप्त कलाकारांची यादी नंतर संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल.
        विद्यार्थी विभागाचे ऑनलाईन प्रवेश अर्ज संचालनालयाच्या https://doa.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर दि.२०.११.२०२३ पासून उपलब्ध करुन देण्यात येईल.
  • 7. सदर तारखात काही बदल झाल्यास तसे https://doa.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.
  • वरील प्रक्रियेबाबत अद्ययावत सूचना वेळोवेळी उक्त संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येतील. तरी संबंधितांनी वेळोवेळी सदर संकेतस्थळाला भेट देऊन अद्ययावत माहिती प्राप्त करुन घ्यावी.